Breaking News
उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी १६ जूनला विशेष लसीकरण सत्राचे आयोजन
नवी मुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ मे व ३ जून रोजी दोन वेळा विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. याचा लाभ परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या ३१९ विद्यार्थ्यानी घेतला होता.
तरीही काही विद्यार्थ्याकडून आणखी एकवार लसीकरण सत्र आयोजन करावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दिनांक १६ जून २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या विद्यार्थ्याना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे अशा १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यानी लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र , परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय - २० किंवा डि एस - १६० फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या वय वर्ष १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यानी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर