द सीड फाउंडेशन संस्थेची मानसिक आरोग्यावर जनजागृती
- by Santosh Jadhav
- Jan 27, 2025
द सीड फाउंडेशन संस्थेची मानसिक आरोग्यावर जनजागृती
ऐरोली : दि. २६ जानेवारी २०२५ भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील द सीड फाउंडेशन या सामाजिक संस्थेने ऐरोली येथे मानसिक आरोग्य या विषयावर व्यापक जनजागृती मोहीम राबवली. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात दुर्गामाता मंदिराच्या परिसरात राष्ट्रध्वज फडकवून करण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांनी एकत्रित राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली.
त्यानंतर द सीड फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. विद्यानंद ऐवळे यांनी मानसिक आरोग्य या ज्वलंत आणि अत्यावश्यक विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सध्याच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या मानसिक ताणतणावांवर उपाययोजना सुचवल्या तसेच मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रभावी सल्ला दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये ऋषिकेश केदारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा समारोप उपस्थित सर्वांना अल्पोपहार वितरणाने झाला.
समाजातील मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा संस्थेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav