वाशी-नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र - कोकण विभागाचा भव्य कार्यकर्ता मेळावा - आप ला मेळावा
- by Santosh Jadhav
- Jan 06, 2023
वाशी-नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र - कोकण विभागाचा भव्य कार्यकर्ता मेळावा - आप ला मेळावा
नवी मुंबई : दिल्ली , पंजाब विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश मिळून, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झालेल्या आप पक्षाचा, आज देशभर झपाट्याने विस्तार होत आहे. देशभरातून पारंपरिक राजकारणातील भ्रष्ट कारभाला कंटाळलेला सामान्य माणूस हा आपकडे शून्य भ्रष्टाचार आधारित संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाचा सक्षम पर्याय म्हणून आशेने बघत आहे. याला आप महाराष्ट्राचा कोकण विभाग देखील अपवाद नाही.
रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी, वाशी डेपोसमोरील, विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सकाळी ९:३० पासून, दुपारी २ वाजेपर्यत आप महाराष्ट्र - कोकण विभागा तर्फे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी क्षेत्रातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकत्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या सर्व क्षेत्रातील सामान्य नागरिकांनी सुध्दा ह्या मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन आप कोकण विभागीय कार्यकारिणीने केलेले आहे.
ह्या मेळाव्यासाठी आप राष्ट्रीय कार्यकारणी तसेच महाराष्ट्र कार्यकारणीचे सदस्य आपापल्या भाषणांमधून, आज सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या विविध जनताभिमुख विषयांवर. कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत. ह्या मध्ये, सरकारी शिक्षण आणि स्वास्थ व्यवस्था, सरकारी निमसरकारी उद्योगाच्या खाजगीकरणाचा चालू झालेला अतिरेक, कामगार आणि शेतकरी समस्या असे विविध विषय आले.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, दिल्ली आमदार आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ह्यांच्या शिक्षण प्रणाली सल्लागार म्हणून काम करून दिल्ली मधील मोफत सरकारी शिक्षण व्यवस्थे मध्ये क्रांतिकारक बदल घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या दिल्लीच्या आमदार - अतीशी उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्था कशी असावी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दिल्ली आमदार कुलदीप कुमार, उत्कृष्ट वक्ते आणि आप महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय या बैठकीला आप महाराष्ट्र कार्यकारिणीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला उपस्थित राहणार आहेत. महादेव नाईक - महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, श्रीमती प्रीती मेनन - राष्ट्रीय प्रवक्त्या, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, किशोर माध्यम - उपाध्यक्ष - महाराष्ट्र, धनराज वंजारी - उपाध्यक्ष - महाराष्ट्र, हरिभाऊ राठोड- उपाध्यक्ष - महाराष्ट्र, धनंजय शिंदे - सचिव - महाराष्ट्र, डॉ. फैजी - राज्य समिती सदस्य, कुसुमाकर कौशिक - प्रदेश समिती सदस्य, विजय कुंभार - संघटन मंत्री आप महाराष्ट्र मंत्री, डॉ. संतोष करमरकर - समन्वयक आरोग्य विभाग उपस्थित राहणार आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav