तुर्भे स्टोअर येथे ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या राजकीय संघर्षानंतर उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली
- by Santosh Jadhav
- May 07, 2022
तुर्भे स्टोअर येथे ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या राजकीय संघर्षानंतर उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली
काम पूर्ण करण्याची तारीख २५/१०/२०२३ अशी आहे.
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर तेथे ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या राजकीय संघर्षानंतर उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून सदर काम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे आहे. काम पूर्ण करण्याची तारीख २५/१०/२०२३ अशी आहे.
तुर्भे स्टोअर येथे गेल्या पंधरा वर्षात घनदाट लोकवस्ती होत असून सातत्याने लोकांचे येण्या-जाण्याची संख्या वाढत असून परिसरातील अनेक कामगार वर्गातील लोक एपीएमसी मार्केट तसेच तुर्भे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी ठाणे बेलापूर रस्ता ओलांडावा लागतो. तसेच तुर्भे रेल्वे स्टेशनला मुंबई ठाण्यावरून आणि पनवेल वरून आलेल्या कामगार वर्गातील लोकांना ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडून अनेक कंपन्यांमध्ये कामाला जावे लागते. यामुळे ठाणे-बेलापूर रस्ता हा दिवसभरात लाखोच्या संख्येने गजबजलेला असतो. नवी मुंबई महापालिकेने लोकांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसुविधांसाठी योग्य नियोजन करून कोणताही मार्ग न काढल्यामुळे अनेक अपघात होऊन मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडले आणि अनेक गंभीर जखमी झालेले आहेत. त्याच बरोबर दररोज रस्ता ओलांडताना एक /दोन अपघात होत असतात.
तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपूल बांधावा यासाठी स्थानिक तत्कालीन नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक , नगरसेविका यांनी अनेक वेळा उड्डाणपुल बांधावा अशी मागणी करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांशी वादावादी करून अनेक वेळा सभात्याग केला.
उड्डाणपूल बांधावा यासाठी अनेक राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार यांनी पालिकेला पत्र व्यवहार केला , उपोषण देखील केले त्या काळात सत्ताधारी राजकीय लोकांना काहीच फरक पडत नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा व माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री, विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला वैतागून तत्कालीन नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी त्यांच्यासोबत नगरसेवक , नगरसेविकासह गणेश नाईक यांना सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तत्कालीन नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी नगरसेवक , नगरसेविकासह शिवसेनेत प्रवेश केला. आज त्याची परिणिती तुर्भे स्टोअर येथे विकास कामाचे पर्व सुरु झाले असून उड्डाणपूल बांधण्याबाबत पहिला कामाला सुरुवात झाली.
तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून अठरा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आहे. ही कामाची सुरुवात असून तुर्भे परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे ठरविले आहे. गरोदर महिलांसाठी तुर्भे स्टोअर येथे हॉस्पिटल बांधण्याचे नियोजन करत आहे. शिवसेनेत खऱ्या अर्थाने प्रवेश केल्याने तुर्भे विभागातील नागरिकांचे भले होणार असून त्यांच्या सर्व समस्या शिवसेनेतच मार्गी लागणार आहेत याची मला खात्री असून अभिमान वाटतो. या कामाचे श्रेय ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांना देत आहे - माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav