" एकच ध्यास.. घारापुरीचा विकास ! " घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना मोठे यश!
- by Santosh Jadhav
- Apr 13, 2022
" एकच ध्यास.. घारापुरीचा विकास ! " घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना मोठे यश!
उरण : (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील घारापुरी येथील लेण्यांच्या देखभालीसाठी एस.आय .एस या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड तैनात आहेत.मात्र सदरचे सर्व सिक्युरिटी गार्ड हे परप्रांतीय असल्याने घारापुरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर घेण्याचा आग्रह ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी कंपनीकडे केला होता.
त्याप्रमाणे सन २०१८ पासुन भारतीय पुरातत्त्व विभाग व एस.आय.एस.सिक्युरिटी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्याप्रमाणे सदरच्या कंपनीने सुरूवातीला तीन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर रुजू करून घेतले असून लवकरच प्रलंबित असलेल्या अर्जदारांनाही नोकरीची संधी मिळणार आहे.सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती करण्यासाठी योग्य ते सहकार्य राजिप सदस्य विजय भोईर यांनी केले.स्थानिक भूमीपुत्रांना सेक्युरिटी गार्ड म्हणून रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढेही उपलब्ध होणार असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी, ग्रामस्थांनी सरपंच बळीराम ठाकूर, घारापुरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहे. स्थानिक भूमीपुत्रांना आहे त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरपंच बळीराम ठाकूर यांनी निर्धार केला असून त्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav