Breaking News
राजभाषा दिना निमित्त मनसे तर्फे विविध उपक्रम उत्साहात संपन्न
उरण : (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणच्या माध्यमातून मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी उरण मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये उरण येथे मराठी भाषेला जागतिक राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषेत स्वाक्षरी मोहीम करण्यात आली होती त्याचे उद्घाटन रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच उरण येथील गोपालकृष्ण वाचनालयास मराठी पुस्तके भेट देऊन मराठी भाषा दिना निमित्त शुभेच्छा देण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नविन शेवा येथे हेमंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा दिना निमित्त नविन शेवा ते उरण या मार्गांवर नागरिकांना मोफत रिक्षा प्रवास पुर्ण दिवस ठेवण्यात आले. त्याचे उद्घाटन मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत यांनी करून शाखेला शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.द्रोणागिरी नोड उरण येथील दुकानावरील मराठी पाट्या (फलक )असणाऱ्या दुकानदारांचे पुष्पगुच्छ देऊन रितेश पाटील व मनसेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन सत्कार केले.मराठी भाषा दिना निमित्त उरण पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत व मनसे पदाधिकारी यांनी पुस्तकं भेट देऊन सर्व पोलीस बांधवांना शुभेच्छां दिल्या.
रिपोर्टर