गोव्यात अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत. ओपिनियन पोलचा निष्कर्ष
- by Santosh Jadhav
- Jan 07, 2022
गोव्यात अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत. ओपिनियन पोलचा निष्कर्ष
पाच राज्यांच्या निवडणूका लवकरच जाहीर होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश , पंजाब , उत्तराखंड , मणिपूर आणि गोव्यात विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी एक जनमत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात चौरंगी लढतीत आम आदमी पार्टी यशस्वी होईल. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सर्वेक्षणानुसार, गोवा विधानसभेसाठी चौरंगी लढत रंजक आणि चुरशीचीही होईल, पण निवडणूकी अंती आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. सत्तास्थापनेसाठी जादुई आकडा पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल, यांचा आम आदमी पक्ष मोठी भूमिका बंजावेल. आप गोव्यात किंगमेकरही ठरु शखतो. आम आदमी पक्षाला २० ते २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आप मुख्य विरोधी पक्ष म्हणूनही पूढे येऊ शकतो, असे या सर्वेक्षणातील निष्कर्षात नमुद केले आहे.
सर्व्हेनुसार, आजच निवडणूक झाल्यास आम आदमी पक्षाला २० ते २५ जागा मिळतील. सन २०१७ मध्ये भाजपने १३ जागा जिकल्या होत्या. तेव्हा आपला या राज्यात खातेही उघडता आले नव्हते. पण आम आदमी पक्षाचे १८ उमेदवार दुसऱ्या क्रंमाकावर थोड्या मताच्या फरकांनी पराभूत झाले होते. यावेळी मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला (आप) २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. गत निवडणूकीत सर्वाधिक १७ जागांवर विजयी होणाऱ्या कॉग्रेसला येत्या निवडणूकांमध्ये ४ ते ६ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज्यात जोरदार प्रवेश करणाऱ्या ममता बॅनर्जीच्या तुणमूल कॉग्रेस पक्षाला अवघी २ टक्के मते मिळतील, असे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. आम आदमी पक्षाने गोव्यातील विविध पक्षांतील तरूण कार्यकर्त्याना आपल्यात समावून घेतले आहे.
गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपणार आहे. गोव्यात एकूण ४० जागांवर निवडणूका होतील. लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर होतील. गत निवडणूकीत भाजप आणि कॉग्रेस असे दुरंगी चित्र होते. यावेळी भाजप, कॉग्रेससह ममता बॅनर्जीचा तुणमुल कॉग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मैदानात असणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav