Breaking News
नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगा ची आज बैठक पार पडणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत. याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी, पश्चिम बंगालचा कार्यकाळ 30 मे रोजी, आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी संपुष्टात येत आहे. तर केरळ विधानसभेचा कार्यकाळ 1 जून रोजी आणि पुद्दुचेरी विधानसभेचा कार्यकाळ 8 जून रोजी संपत आहे.
रिपोर्टर